चार दोन मोठे व्यापारी बसुन व्यापारी महासंघाच्या नावाने उठसूठ हजारो गरिबांच्या कसे काय बंद करू शकता?

चार दोन मोठे व्यापारी बसुन व्यापारी महासंघाच्या नावाने उठसूठ हजारो गरिबांच्या कसे काय बंद करू शकता?
गेवराई/प्रतिनिधी
गेल्या आठवडयात जनतेला कोरोनासंदर्भात गेवराई शहर बंद ठेवण्याचे आवाहन केल्याने नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला.नंतर जनतेला कळाले की, जनतेला विश्वासात न घेता व्यापाऱ्यांनी निजी स्वार्थासाठी बंद आयोजित केला होता. आता पुन्हा विशिष्ठ मोठया मोजक्या व्यापाऱ्यांनी एकत्र येवून इतर कोणत्याही छोटया व्यापाऱ्यांना विश्वासात न घेता दि. १९ ते २२ जुलै असे ४ दिवस गेवराई बंदचे आवाहन व्यापाऱ्यांनी केले आहे. आणि सोशल मिडिया व वृत्तपत्रांना माहिती दिली. त्यानंतर गेवराई शहरातील छोटे उद्योग करणारे, हातावर पोट भरणारे मजुरी करणारे यांना व्यापारी संघटनेने विश्वासात न घेता ४ दिवस गेवराई शहर बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शहरातील छोटया व्यापारी दुकानदारांमध्ये असंतोष पसरला. आणि सोशल मिडियावर निषेधाचे मजकूर झळकले. छोटया व्यापाऱ्यांचा या बंदला पाठिंबा नाही. काही मोठे व्यापारी मनमानी करत आपले निर्णय इतरांवर लादत आहेत. छोटया व्यापाऱ्यांमध्ये चीड निर्माण झाली असूुन गेवराई बंदमध्ये सहभागी होणार नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे








