कु.हर्षदा रवींद्र बारस्करचे १२ परिक्षेत घवघवीत यश

Beed

कु.हर्षदा रवींद्र बारस्करचे १२ परिक्षेत घवघवीत यश

बीड/प्रतिनिधी 

आज एकल महिला संघटना बीड च्या आयोध्यानगर येथील सदस्य सुनीता बारस्कर. यांची कन्या कु.हर्षदा रवींद्र बारस्कर हिने पित्याचे छत्र नसतानाही १२ कॉमर्स शाखेतून ७५%गुण घेऊन यश  प्राप्त केल्याबद्दल एकल महिला संघटनेच्या वतीने तिचा घरीच छोटासा सत्कार करण्यात आला आहे.

तसेच आज  साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी असल्याने त्यांचे पुस्तक तिला भेट दिली. सुनीताताई यांनी 
शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपल्या मुलांना पित्याची उणीव न भासु देता  अनेक काबाड कष्टाने काम अथवा इतर कोणत्याही कष्टाच्या कामाची लाज न बाळगता मुलांच्या शिक्षणाचा व उदरनिर्वाहाचा भार समर्थपणे पेलून धरला तेव्हा आजच्या प्रसंगी ते हि अभिनंदनास पात्र आहेत. कु.हर्षदा बारस्कर हिच्या छोट्या भावाचा ही १० वी चा निकाल येणे बाकी आहे, तो ही चांगले यश संपादन करेल अशी सुनीता ताई यांना आशा आहे. 

यावेळी  एकल महिला संघटना च्या लीडर साधना नागापुरे, सुनीता बारस्कर, मनीषा मुंडे, प्रणाली नागापूरे आदी उपस्थित होते.

Sharing

Visitor Counter