शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदाने लवकरच मिळणार - आ. बाळासाहेब आजबे

शेतकऱ्यांची प्रलंबित अनुदाने लवकरच मिळणार - आ. बाळासाहेब आजबे
आष्टी/प्रतिनिधी
बीड प्रसार न्युज
आष्टी ,पाटोदा ,शिरूर मतदार संघातील शेतकऱ्यांची राष्ट्रीय फलोत्पादन अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजने मधील मागील काळातील वेगवेगळे अनुदाने हे प्रलंबित होती त्याबाबत आपण पालकमंत्री धनंजय मुंडे साहेब व राज्याचे कृषिमंत्री नामदार दादा भुसे साहेब यांच्याकडे पत्र देऊन मागील सरकारच्या काळातील शेतकऱ्याची प्रलंबित अनुदाने त्वरित मिळावते अशी मागणी केली होती त्याची मंत्रीमहोदयांनी तात्काळ दखल घेत पुढील कार्यवाही आदेशित केली आहे.त्यामुळेे लवकरच सर्व प्रकारची प्रलंबित अनुदाने हे शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले .
आज करोना महामारीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे ,अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील पैसे खर्च करून शेतीची विविध कामे केली त्यामध्ये शेततळे अस्तरीकरण , कांदाचाळ सामूहिक शेततळे , पॉलिहाऊस यासारखी कामांची काही कारणाने शासनाकडून अनुदान प्रलंबित राहिली होती ती तत्काळ मिळावी यासाठी आपण वेळोवेळी पालकमंत्री धनंजय मुंडे व कृषिमंत्री यांच्याकडे कामांची प्रलंबित अनुदान मिळावीत यासाठी पाठपुरावा केला याची तात्काळ दखल घेत कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभागाने कार्यवाही केल्याचे पत्र आपणास दिले आहे त्यामुळे मतदारसंघातील शेतकऱ्यांचे अनेक दिवसाचे रखडलेले प्रलंबित अनुदान हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत ,शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न हे सरकार प्राधान्याने मार्गी लावत असल्याचे ही शेवटी बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.








