शिराळ येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर भाजपा वतीने संबळ आंदोलन

Beed

शिराळ येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर भाजपा वतीने संबळ आंदोलन

आष्टी/प्रतिनिधी.
बीड प्रसार न्युज.

आष्टी,पाटोदा,शिरूर मतदारसंघात आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली बँक, कृषी, तहसिल कार्यालयासमोर पिककर्ज व विविध मागण्यांसाठी संबळ आंदोलन व बैलगाडी आंदोलन करण्यात आले.याच वेळी शिराळ येथे देखील भारतीय जनता पार्टी व आ.सुरेश धस मित्र मंडळाच्या वतीने संबळ आंदोलन करण्यात आले.
गेल्या दोन वर्षातील दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला आहे.कोरोणा महामारीत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे हंगामी शेती मशागतीसाठी व पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध नाही.
यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांना बँकेचे अधिकारी कर्ज मंजूर नाही, वयोमर्यादा संपली, सिबील रिपोर्ट नाही असे एक ना अनेक कारणे सांगून शेतकऱ्यांना
कर्ज उपलब्ध करुन देण्यास बँका टाळाटाळ करत आहेत. कर्ज प्रकरणाचे हजारो अर्ज प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन जुन्या माफीतील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळालेच पाहिजे या मागण्यासाठी भारतीय जनता पार्टी आष्टी तालुका व आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली शिराळ येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर संबळ वादन आंदोलन करण्यात आले.यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी बँकेचे मॅनेजर पोतदार यांना विविध मागणीचे निवेदन दिले. 
यावेळी आंदोलनात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे, गण प्रमुख राजेंद्र खिळे,नवनाथ जगताप, अशोक परकाळे,
संदीप कारंजकर,ऋषिकेश खिळे, विकास करडुळे,असलम शेख,भरत खिळे,दिपक खिळे,सावता आस्वर,रुद्रेश्वर आजबे, सुनिल खिळे,अनिल आजबे आदी भारतीय जनता पार्टी व आ.सुरेश धस मित्र मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Sharing

Visitor Counter