गरीबांना अन्नधान्य वाटप करा अन्यथा आंदोलन - खुर्शीद आलम

Beed

गरीबांना अन्नधान्य वाटप करा अन्यथा आंदोलन - खुर्शीद आलम

बीड/प्रतिनिधि

सद्या कोरोना ने अख्या भारतात तांडव सुरू केलेले आहे त्यामुळे जवळपास सर्व भारत बंद आहे या बंद मुळे अजुन बेरोजगारीत वाढ झाली आहे हातावर पोट असणाऱ्या गोरगरीब लोक निराधार झाले आहे अनेक गरीब कुटुंबातील लोकांना उपाशी पोटी मरणाची वेळ आली आहे.

गरिबांची लहान लहान मुले अन्नधान्य साठी दारोदार भटकत आहेत या मुलांना पाहून डोळ्यात आश्रु येत आहे, आणि सरकार फक्त मोठमोठय़ा घोषणा देत आहे सरकार च्या या घोषणाबाजीने गरिबांचे पोट भरणार नाही घोषणा एवजी पोटाला अन्नधान्य द्यावे गरिबांना अन्नधान्य देण्याची मागणीसाठी केली तहसील कार्यालयात अनेक वेळी चकरा मारल्या आहेत

शासन प्रशासनात अन्नधान्य साठीची आमची मागणी घुसत नाहीये म्हणून आज दि.४/४/२०२० रोजी दोन बाए तिन च्या कागदावर लिहून आंदोलनाची माहिती पुरवठा संबंधित अधिकार्यांना देण्यात आली आहे.

निवेदन अंतिम असुन या नंतर थेट आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगरपरिषदेचे माजी सभापती खुर्शीद आलम यांनी दिला आहे.

Sharing

Visitor Counter