रगड साहेबांनी जेवन न करता आपले कर्तव्य पार पाडले.

रगड साहेबांनी जेवन न करता आपले कर्तव्य पार पाडले.
बीड/शेख सलमान
शहरातील अडत मार्केट माळी गल्ली भागातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता.उन्हाळ्याच्या या उकाळा आणि एन संचार बंदीच्या काळात सर्वच नागरीक घरात असल्याने आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे लोकांना प्रचंड त्रास होऊ लागला होता.लहान बालके आणि वयोवृद्धासह नागरिकांना प्रचंड त्रास होऊ लागला.
या भागातील शेख सलमान यांनी तात्काळ रगड साहेब यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व त्यांनी तात्काळ येऊन पाहणी केली असता त्याठिकाणी लक्स गेल्याचे समजले. परंतु रगड साहेबाने लक्स अवघ्या पंधरा मिनिटात बदलून दिले सांगण्यासाखी गोष्ट म्हणजे रगड साहेब जेवण करण्याच्या वेळेत जेवण न करता आपला कर्तव्य पार पाडले आहे.
कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सगळेच कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडत आहेत या ठिकाणी पाहायला भेटले.नागरिकांनी पन घरात राहुन आपला कर्तव्य पार पाडले पाहिजे.








