संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज बीड/प्रतिनिधी.

Beed

करोना विषाणूचा प्रादूर्भाव थोपवण्याच्या दृष्टीने राज्यात सोमवारी संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून जनतेला घरात राहणाचे आवाहन केले जात आहे.

जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, सोमवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून 31 मार्च पर्यंत बीड जिल्ह्यात संचारबंदी (कर्फ्यु) लागु करण्यात आला असून या काळामध्ये कुठलाही व्यक्ती अनावश्यकपणे रस्त्यावर दिसून आल्यास त्या विरोधात दंडात्मक कारवाईसह कठोर कारवाई करण्यात येईल.

रोज सकाळी 11 ते दुपारी 3 कार्यकाळामध्ये संचारबंदी जिवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी शिथील करण्यात येईल.

या काळातच जिल्ह्यातील नागरिकांनी आपले जीवनावश्यक वस्तू खरेदी करावयाच्या आहेत. या शिथील काळातही पाच पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास त्यांच्याविरोधातही कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यातल्या 16 सीमा लॉक केल्या असून या भागातून केवळ जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे वाहनच जिल्ह्यामध्ये घेतले जातील.

या वाहनामध्ये पाच पेक्षा अधिक लोक आढळून आल्यास ते वाहन जिल्ह्याच्या सीमेत घेतले जाणार नाही. असे म्हणत जिल्हाधिकार्‍यांनी लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी हा कठोर निर्णय घेतला जात असल्याचे सांगून जनतेने काल जसं सहकार्य केले तसे सहकार्य पूढील कार्यकाळात करावे असे आवाहन केले.

Sharing

Visitor Counter